• ब्रॉयलर पक्षी -
- आजारी पक्ष्यांना उपचारातून बरे करण्यास बराच कालावधी लागत असल्यामुळे त्यांच्या मांसाच्या गुणवत्तेवरदेखील परिणाम होतो. अशा स्थितीत आजारी पक्ष्यांची संपूर्ण बॅचदेखील वेगळी करावी लागते.
- ब्रॉयलर पक्ष्यांना मॅरेक्स, गम्बोरो, रानीखेत, इन्फेशिअस कोरायझा, इन्फेशिअस ब्रॉन्कायटीस इ. यासारखे घातक आजार होतात. या आजाराच्या प्रतिबंधासाठी बाजारात लस उपलब्ध आहेत. यामध्ये एक दिवसाच्या पिलापासून वयस्क पक्ष्यांना विशिष्ट कालावधीत लसीकरण करणे महत्त्वाचे असते. यामध्ये मुख्यत्वे डोळ्यांमधून, त्वचेमधून, पाण्यातून व मासांतून लस दिली जाते.
• ब्रॉयलर कोंबड्याच्या लसीकरणाचे वेळापत्रक :
अ.क्र. – वय (दिवस) – रोग – लसीचे नाव – प्रमाण – देण्याचा मार्ग
१. १ ला दिवस – मॅरेक्स – मॅरेक्स लस – ०.२ मिली. एक थेंब – त्वचेखाली/डोळ्यातून
२. ४ ते ५ दिवस – रानीखेत – लासोटा – प्रत्येकी २ थेंब – डोळ्यात व नाकात
३. १८ ते १९ दिवस – गंबोरो – गंबोरो लस – १ थेंब – डोळ्यातून किंवा पिण्याच्या पाण्यातून
• लेअर पक्षी -
- लेअर पक्षांचे विविध आजार हे पक्षाची उत्पादकता कमी करण्यास कारणीभूत ठरतात.
- लेअर पक्षांना प्रामुख्याने रानीखेत, रक्ती हगवण, देवी, मॅरेक्स, गम्बोरो, इन्फेशिअस कोरायझा इ. आजारांचा समावेश होतो.
- पिलांच्या जन्मापासून वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत अनेक प्रकारच्या लसी दिल्या जातात.
• लेअर कोंबड्याच्या लसीकरणाचे वेळापत्रक :
अ.क्र. – वय – लसीचे नाव – देण्याचा मार्ग
१. १ ला दिवस – मॅरेक्स – मॅरेक्स लस – मांसात
२. ५ ते ६ दिवस – रानीखेत – लासोटा – डोळ्यात
- एन.डी. क्लिड – त्वचेखालून
३. ९ ते १० दिवस – मॅरेक्स – मॅरेक्स बुस्टर (एच.व्ही.टी. +एसबी१) – त्वचेखालून
४. १४ वा दिवस – गंबोरो – गंबोरो लस (आयबीडी स्टँडर्ड) – डोळ्यात
५. २४ वा दिवस – गंबोरो – आयबीडी प्लस – पाण्यातून
६. ३० वा दिवस - इन्फेशिअस ब्राँकायटीस – आयबी लस – पाण्यातून
७. ३५ वा दिवस – रानीखेत – लासोटा बुस्टर – पाण्यातून किंवा डोळ्यातून
८. ४२ ते ४५ दिवस – देवी – देवी लस – पंखातून (लँसेट प्रिकरच्या मदतीने)
९. ५० ते ५५ दिवस – रानीखेत - लासोटा बुस्टर – पाण्यातून
१०. ६० वा दिवस - इन्फेशिअस कोरायझा – आयबी प्लस – त्वचेतून
११. ६५ ते ७० दिवस – रानीखेत – मुक्तेश्वर आर२बी – त्वचेतून
१२. ६५ ते ७० दिवस – देवी – देवी लस (बुस्टर) – पंखातून (लँसेट प्रिकरने)
१३. ८० वा दिवस - इन्फेशिअस ब्राँकायटीस – आयबी लस – डोळ्यातून
१४. ९० वा दिवस – देवी – आय.बी. लस – त्वचेतून
१५. १६ वा आठवडा – देवी – देवी लस (बुस्टर) – पंखातून (लँसेट प्रिकरने)
१६. १८ वा आठवडा – रानीखेत – आर२बी मुक्तेश्वर (बुस्टर) – त्वचेखाली
१७. १९ वा आठवडा – गंबोरो – गंबोरो लस – पाण्यातून
१८. ४० वा आठवडा – रानीखेत – लासोटा बुस्टर – पाण्यातून
१९. ४० वा आठवडा - इन्फेशिअस ब्राँकायटीस – आय.बी. लस - पाण्यातून
(टीप : लसीकरण पशुवैद्याकाकडूनच करावे.)
• लसीकरण करताना घ्यावयाची काळजी :
- लस साठवून ठेवण्यासाठी किंवा वाहतूक करताना बर्फाचा वापर करावा.
- लसीकरणासाठी वापरात येणारी सर्व उपकरणे निर्जंतुक करावीत. दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
- लसीकरण अगोदर व लस दिल्यानंतर दोन दिवस पक्ष्यांना जीवनसत्त्वयुक्त आहार द्यावा. यामुळे पक्ष्यांना येणारा ताण कमी होण्यास मदत मिळते.
- लस तयार केल्यानंतर साधारणतः ३ ते ४ तासात संपवावी. पक्ष्यांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घ्यावी.
- ठराविक लसीची मात्रा तपासूनच लसीकरण करावे.
- लसीकरणाची वेळ शक्यतो सकाळी लवकर वा सायंकाळी असावी. यामुळे पक्ष्यांवर वातावरणाचा आणि लसीकरणाचा एकत्रित ताण पडणार नाही.
- पक्ष्यांना कॅल्शिअम, फॉस्फरस व इतर खनिजद्रव्ययुक्त आहार द्यावा. पक्ष्यांच्या २० व्या दिवशी जंतनाशकाची मात्रा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावी.